Testimonial

मी गेली ४० वर्षं संगीताच्या क्षेत्रात आहे. मी गायिका आहे, प्राध्यापिका आहे, लेखिका आहे. अनेकजणं मला ओळखतात. बरंच काम माझं व्हायचं बाकी आहे. काही काम केलेलं आहे याची जाणीव आहे. पण मला एक focus हवा होता आणि माझ्या कार्याला योग्य दिशा हवी होती. आणि या शोधात असताना शिरीष मामाने माझी गुरूश्रींशी ओळख करुन दिली. आणि पहिल्या पाच मिनिटांच्या भेटीतच मला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली. माझ्या आयुष्यात ज्या घटना घडत आहेत त्या का घडत आहेत याचं मला उत्तर मिळालं- अमुक गोष्टी का होत आहेत, काही गोष्टी facilitate होत आहेत, काही गोष्टींमध्ये विरोध होतो आहे या सगळ्याच्या मागे काहीतरी निश्चित एक योजना आहे destiny ची, असं मला जाणवलं. आणि त्यानंतर मी ‘मा फलेषु कदाचन’ हे दिवसभराचं एक सेशन केलं आणि आता मी पुण्यात ‘Purpose of Life’ चं दोन दिवसाचं सेशन केलं. यातून मला खूप उत्तरं मिळाली आहेत. गुरूश्री तेव्हा जे जे सांगत होते, ते फक्त मी tick mark करत होते, की हो, हे माझ्या बाबतीत झालंय, हे ही माझ्या बाबतीत झालंय. आणि एक phase अशी होती की एवढं सगळं मी करतीये पण मला हवी तशी दैवाची साथ मिळत नाहीये किंवा मला हव्या तशा गोष्टी घडत नाहीयेत. अमुक व्यक्तीनी मला पाहिजे तसं काम करत नाही की जे माझ्यासाठी उपयुक्त ठरेल. अशा व्यक्ती मला मिळत नाहीयेत, अशी chain निर्माण होत नाहीये. 

माझ्या मनात खूप काही तक्रारी होत्या तर आता अशी परिस्थिती आहे की मला असं जाणवतं पदोपदी की खरोखर प्रत्येक व्यक्ती जणू माझ्याचसाठी काम करत आहे. प्रत्येक संस्था माझ्यासाठी काम करत आहे. अगदी आपल्या बायकांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपल्याला ज्या घरकामात आपल्याला मदतीसाठी बायका येतात, त्याही कुठेतरी ultimately आपल्या life purpose साठीच आपल्याला मदत करत असतात. आणि त्याही आपल्याला मिळणं, त्या वेळेवर असणं, त्यांची तुम्हाला साथ मिळणं इथून ते अगदी विविध संस्थांची साथ मिळणं हे सगळं life purpose पूर्ण करण्यासाठीच मदतीचं ठरतं. 

मी एक वेगळ्या प्रकारची चळवळ चालवते कारण मी फक्त कार्यक्रम करत नाही किंवा व्यावसायिक दृष्टीने ऑर्केस्ट्रा करत नाही तर लोकांना गाणं कसं ऐकावं हे मी जीव तोडून सांगायचा प्रयत्न करत आहे. माझ्या लिखाणातून तेच व्यक्त होतंय, माझ्या गाण्यातून मी हे सांगत आहे की या गाण्याच्या मागे हे सौंदर्य आहे हे तुम्ही जाणून घ्या. ही जी माझी चळवळ आहे त्याच्यासाठी आता संस्थाच माझ्या मागे येत आहेत. संस्था मला आपणहून approach होत आहेत की तुम्ही आमच्यासाठी हा कार्यक्रम करा. मला आता वेळ नाही, माझ्याकडे एकही तारीख रिकामी नाही अशी परिस्थिती आहे! पूर्वी मला वेळ लागायचा लोकांना सांगायला की असं तुम्ही ठेवा, हा वेगळा कार्यक्रम आहे, आणि आता त्या संस्थाच मला approach होतात! 

आता मला हे अनुभवायला येतं आहे कारण हे फक्त माझं काम नाहीये, हे त्या creator चं काम आहे. मी फक्त ती कोणीतरी एक माध्यम आहे. त्या creator ला माझ्या माध्यमातून हे करुन घ्यायचं आहे. आता मी कुठेतरी connect झालीये त्या creator शी म्हणून हे सगळं इतक्या सोपं होतंय आणि पुन्हा तेच मला आज जाणवलं की ते करताना मला थकायला होत नाही. लोकं मला नेहमी विचारतात की तू एकावेळी नोकरी करतेस, प्राध्यापिका आहेस, तू विद्यापीठात काम करतेस आणि शिवाय एवढे कार्यक्रम करतेस, हे कसं जमतं? तर ते जमतं कारण की ते माझं passion आहे, तेच माझं काम आहे जे मी करणं अपेक्षित आहे. 

गुरुश्रींच्यामुळे मला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत जात आहेत. मला याची जाणीव आहे की मला खूप पुढे अजून जायचं आहे पण ही ताकद दिल्याबद्दल गुरुश्रींचे मनापासून आभार.

Mrudula Dadhe